Saturday, May 31, 2008

प्रकाशपक्षी.

हाताची घडी, तोंडावर बोट;
आता फ़क्‍त बोलीन चुटुक मुटुक !

दु:ख ? वेदना ?? झटक, कटाप ----
तालात नाचेन ढिंच्याक्‌ , ढिंच्याक्‌ !

तोंडभर हसीन, गालभर सतेज,
सडे पसरतील, चांदणं फ़ुलेल !

रानवट प्रदेश, झाडं हिरवीकंच,
फ़ांदीवर मैना गाता गाभुळेल चिंच !

इथे कसला अंधार ? कुठला बागुलबुवा ?
रात्रपक्षी घेऊन येतील उजेडांचा थवा !